Thursday 30 July 2015

म्हणून नाही विचारल तूला...

म्हणून नाही विचारल तिला...
उत्तर मला ठाऊक होत..
आवडली होती मला पण काय वाटेल तिला विचारल तर
म्हणून नाही विचारल तिला...
एकत्र आहोत बरेच दिवस बरीच वर्ष एकमेकांच्या सूःखात दुःखात
अशी ही मैत्री चिरतरुण रहावी
म्हणून नाही विचारल तिला...
तूझी बायको नशीबवान असेल अस म्हणनारी ती आणि तुझा नवरा नशीबवान असेल अस म्हणनारा मी..दोघेही फार नशीबवान आहोत कारण अशा मैत्रीच्या रेषा नशीबातच असाव्या लागतात ...तू माझा बेस्ट फ्रेन्ड् आहेस आणि आपण बेस्ट फ्रेन्ड्सच राहुया अस केलेल प्रॅामीस ...
म्हणून नाही विचारल तिला...
जगाच्या पाठीवर कुठेही कधीही भेट बंडे ...!!! ही मैत्रीची ही गाठ कधीही सूटणार नाही ...मैत्रीच्या काही गाठी फार अतूट असतात आणि ती तूटू नये म्हणूनच नाही विचारल तूला.....