Tuesday 4 August 2015

आठवणीतली एक रात्र .......Kalavantinicha Durga-Prabalgad


             आम्ही साधारण आठ नउ  लोक एका पनवेल जवळ ट्रेक ला गेलो होतो.तेव्हा विंटर सीज़न चालू होता . ट्रेक होता कलावंतिनीचा दुर्ग आणि प्रबळ गड .सगळे पहिल्यांदाच येत होते या गडावर. पहिली एक रात्र गावातच एका  वहारंडया मधे राहिलो मग सकाळी सकाळी आम्ही पहिल्यांदा कलावंतिनिला जाऊन आलो आणि प्रबळ गडावर जाता जाता एका शेतात रात्रि राहायची सोय करावी असे विचार करून गावा बाहेर एक शेतात बस्ता टाकला आणि तिथल्याच शेता बाहेर एक झोपडिमधल्या एका आज्जी ची रहायची परवानगी घेऊन आंम्ही निघालो आणि खुप भटकून  आणि रात्रि उशिरा परतलो उशिरा म्हणजे साधारण ८-९ वाजले असतील.आता मग मस्त टोमॅटो सूप करुया म्हणालो.मग सूप पिणे  झाले , मग खाणे झाले मधेच ती म्हातारी आली .बराच वेळ उभी राहिल्या नंतर काहीच बोलेना. सगळे आपआपले काम करात होते … कोणीच बोलना तिच्याशी …. …………शेवटी मलाच कसेतरी वाटले . मग काही तरी बोलायच म्हणून मीच चालू केला बोलना मग कश्या आहात , रात्रीचे तुम्हाला थोड़े कमीच दिसत असेल,…… वगैरे वगैरे विचारल्या नंतर त्या गेल्या १५-२० मिनट गप्पा मारून .…………
          मग साधारण १२-१ वाजले असतील आमच् सगळ उरकल होता आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो . आम्ही जिथे बसलो होतो ते एक शेत होते. शेताच्या डाव्या बाजूला २०-३० फुटावर एक छोटी वीटभट्टी होती आणि त्या सामोरच ती म्हातारी एका झोपड़ी मधे राहात होती झोपडी तशी छोटीच होती .
आमच्या समोर उजव्या हाथाला मोठा प्रबळ गड डाव्या बाजूला कलावंतीन गड आमच्या मांगे एक कोरडा छोटा ओढ़ा होता ओढ्यापालिकडे घनदाट जंगल आणि वरती मोकळा आकाश रात्रीचा थंड वार सुटला होता समोर शेकोटी चालू होती आम्ही राउंड करुन बसलो होतो नेहमी प्रमाणे छान गप्पा चालू होत्या. पण मधेच तुक्या (अमित) म्हणाला "अरे थांबा !! कोणाचा तरी आवाज येतोय , कोण तरी बड़बड़ करत आहे कोणी तरी बाई ………………  " कोणाचाच लक्ष नहीं……परत तो तेच म्हणाला………मग सगळे हळूहळू शांत झाले …………
       आमच्या बोलण्याच कुजबुजन्या मधे रूपांतर झाल ……आम्हाला पण एक आवाज येऊ लागला आधी अस्पष्टा ……मग हळूहळू एकदम स्पष्ट …"ऐय गां *** पौरानु  कायला आलात हिकड ……जा तुमच्या गावाला परत ……जा सूटा …हात्ताच्या हआत्ता …निघा !!!!!" ………ती म्हातारी भयंकर पेटली होती मधेच काय झाल असेल तिला अचानक का ओरडायला लागली  असा सगळे विचार करू लागले …पहिल्यांदा  कोणाच लक्ष नव्हत……पण नंतर ती जास्तच ओरडायला लागली …सगळ्यांच लक्ष तिकडे केंद्रित झाल …मधेच ती झोपडित जात होती …पुनः बाहेर यायची …आम्हाला वाटल की आमच्या बड़बड़ मुळे कदाचित चिडली असेल मग आम्ही शेकोटी विझावली …चुल बंद केलि …थोड़ा वेळ शांत पण परत आता नविन प्रकार आता ती बैटरी घेऊन आमच्या दिशेने चमकवून बोलू लागली……आणि मधे किस्सा काय की ती झोपडी मधे गेली की आतमधुन एका माणसाचं आवाज……हम्म्……ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म …ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म……आता मात्र आमची थोडिफार  टरकली……कारण आत मधे म्हातारी सोडून कोणीच नव्हत ……मग तिला तो कुठलासा आजार असेल तो दोन पर्सनालिटी वाला असा विचार,.......
        हे सगऴ चालू असताना अजुन त्यात मज्ज्या म्हणजे आमच्या टेंट च्या मांगे एक कोरडा ओढ़ा होता झाडाचा त्यात सगळा पालापाचोळा पडलेला…… सगळा गुडुप्प अंधार……अजूबाजुला जंगल …आणि तेव्हाच टेंट च्या मागच्या बाजूने काही तरी सॉलिड सळसळ झाली ……ती सळसळ इतकी भयंकर  होती की एकाच वेळेला सगळे टरकले …आता म्हणल कुठल तरी जनावर आलेल दिसतय आता प्रश्न  असा होता की जनावर कुठले आसु शकते साप ? अस्वल ? बिबट्या? गाय ? बैल? म्हैस? हरिण ? वाघ ? नेमक ओळखणार कैसे ?? …मग गाय ? बैल? म्हैस सोडून दया रात्रीचे ते झोपतात,................आता राहिली  रात्रि फिरणारी  जनावरे  ......... असंख्य जनावर आमच्या मनात येऊन गेली  फुल ओंन सगळ्यांची टरकली …आता समोर ती अंगात आलेली म्हातारी आणि मांगे ही सळसळ……या दोघांच्या मधे आम्ही टरकलेले ……शेकोटी लावली तर म्हातारी येईल म्हणून ती  ही नाही लावली ……मग आम्ही सगळे अपापले चाकू, गुप्ती , सूरया घेऊन एकमेकांना पाठिस पाठ लावून बसलो ……जे होईल ते होईल आपन फुल ओन नडु  …………
पुढचा अर्धा तास आम्ही तसेच कोणाला तरी शु लागली आता …मग सगळेच सोबत चाकू वगैरे घेऊन दोन फुटांवर करून आले…सगळे थोड़े मोकळे होउन जागेवर परतले……सळसळ थोड़ी कमी झाली होती त्यामुळे तिकडच् एक टेंशन गेल होता ……आता एक होती ती  म्हातारी सलग अखंड बड़बड़ चालू होती शिव्या चालू होत्या पोर आता वैतागली होती …मग हळु आवाजात बॉबी म्हणला ""चला अपण सगऴ पैक करू आणि निघु आत्ताच्या आत्ता काढ़ा तम्बू भरा बॅग" ……तसा करण मुळीच शक्य नव्हत मग सगळे हलु हळू आइडियाज देऊ लागले ……मग आता आमच्या मधला एक शुरवीर जागा झाला आणि तो (नचिकेत) म्हणाला "सगळे आत्ताच्या आत्ता झोपा नाहीतर मि जातो त्या म्हातारी कड़े आणि बघतो जाऊन काय प्रकार आहे तो…"
झाल !!!!!! आता हा असा म्हणाला आता हे काय आणखी नवे प्रकरण होणार ? सगळ्यांच्या मनात गड़बड़
आणि तो उठायला पण लागला तेवढ्यात सुबोध म्हणाला "नचिकेत अरे च** आहेस का तू ??? कशाला जातोस तू तिकडे ?…………………………………………" नचिकेत आणखीनच भडकला परत सुबोध त्याला शांत करत म्हणाला "अरे नाही !!!! मी च** !! मी च** .......समजून  घे मित्रा असा करू नकोस ठीक आहे… ठीक आहे सगळे झोपतील आता पण तू जाऊ नकोस तिकडे "……सगळ्यानी अंधारात चाचपडत अपापली अंथरुण पांघरुण काढले आणि तेहि एकदम गुपचुप ……या कानाची त्या कानाला खबर नाही…  तिकडे म्हातारी  आता झोपड़ी मधून  अधूनमधून बाहेर येतच होती …आम्ही सगळे पहुडलो आणि आमच्यातला एक जन म्हणाला "तो शुक्र तारा आहे का रे ?……  मग सप्तर्षि , मृग नक्षत्र वगैरे वगैरे सगळ्यांना दिसू लागले ……आणि जे होईल ते होईल आता आपण झोपुया असे म्हणून सगळे झोपले ( केवळ नचिकेत मुळे…नहितर सगळी पोरे रात्रभर जागलि असती …  )…………………तेव्हा रात्रीचे २ वगैरे वाजले असतील ……आणि झोपताना ठरल की सकाळी लौकर उठायचा आणि पळायच ………
       नेहमी थकलेली दमलेली पोरे दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजल्या शिवाय उठत नाहीत पण त्या दिवशी सकाळी ६ च्या ठोक्याला सगळे तयार होऊन बॅग भरून तंबू बांधून एकदम तयार……… कोणालाही उठवाव लागल नाही …सगळ्यांनी अवरले आणि झोपड़ी च्या    ५० -६० फुट दुरुन निघाले …………

     आणि काही दिवसांनी दुसऱ्या ट्रेकर्स कडून कळले की ती म्हातारी वेडीच होती ………
ती रात्र आमच्या पैकी कोणीच विसरु शकणार नाही