Friday 15 April 2016

Maitri !!!

मैत्री !!
जिवलग मित्रांबद्दल काहीसे लिहावेसे वाटले म्हणून लिहितोय ...मैत्री म्हणजे काय माझ्या एक मैत्रिणीने फारच छान लिहिले आहे ....सर्वात पाहिले कारण म्हणजे आपल्याला त्याची सोबत आवडते, सोबत म्हणजे नुसते एकत्र असणे ,एकत्र फिरणे, असे नाहीं तर गप्पा सुद्धा यामधे येतात. आपल्याला आलेले भलेभुरे अनुभव, एखाद्या घटने बद्दलचे आपले मत,प्रतिक्रिया, आपल्याला मिळलेल यश किंवा अपयश हे सगळच आपल्याला कोणाला तरी सांगावेसे वाटते, आणि आपले ऐकणारा श्रोता, आणि त्यावर प्रतिक्रिया देणारा, आपल्याला सल्ले देणारा एक मार्गदर्शक आपल्याला नक्कीच हवा असतो,अशी एखादी व्यक्ति आपल्या आयुष्यात आली त्या दोन जीवांचे एक मैत्र तयार होते ( इथे माझे  जवळ जवळ २०-२५ जिव तर नक्कीच आहेत ज्यामुळे आमच मैत्र तयार झालय ) मग त्या नात्याला संवादाची पण गरज रहात नाहीं, थेट देहबोलीतुन आवाजावरुन एकमेकांच्या भावना पोचल्या जातात , त्यावरच्या प्रतिक्रिया आपसूकच घडतात त्यातूनच मैत्रीचे सुन्दर नाते फुलत जाते.आणि हे सगळे एकाच वाक्यात सांगायचे झाले तर "प्लीज़ मला एकटे सोड " असे निक्षून सांगितले तरी जो हात सोडत नाही आणि आणखीनच घट्ट धरून ठेवतो तोच खरा मित्र.          
       आज पर्यन्त अनेक जण भेटले शाळेपासून कॉलेज पर्यन्त आणि कंपनी मधे सुद्धा !! पण बरेच जण आले काही दिवस , काही वर्ष सोबत राहिले आणि नंतर निघूनही गेले. शाळेमधले जिवलग अजूनही सोबत आहेतच ति म्हणजे आमची ट्रेकिंग ची मंडळी , पण शाळेनंतर आणि कॉलेजच्या सुरु असताना जे माझ्या कॉलेजमधेही नव्हते असे काही दोस्त मला भेटले काही ट्रेकिंग मुळे आणि काही कम्प्यूटर गेम्स मुळे , ते अजूनही सोबत आहेत आणि पुढेही राहतीलच . डिप्लोमाला असताना मला कम्प्यूटर गेम्स खेळायच खुप वेड होता. सायबर कैफ़े मधे जाऊन मी गेम्स खेळायचो , तिथेच काही लोकांची ओळख झाली आणि ती एवढी दॄढ़ झाली की बस !! ते सगळे माझ्या पेक्षा मोठे कोणी इंजीनियरिंग ला तर कोणी बीसीएस असे सगळे वेगवेगळे पण तरीही गेम्स खेळायला सगळे एकत्र त्यावेळी माझ्या कड़े मोबाइल नव्हता घरी लँडलाइन होता आणि सायबर कैफ़े बाहेर कॉइन बॉक्स !!! सगळ्यांचे मोबाइल नंबर पाठ , सगळे आपले एक फ़ोन वर हजर ( कॉलेज बंक करून ) काही वेळेस दिवसभर कॉलेज च्या नावाखाली गेम्स खेळलो आहोत. १०-१२ वर्ष तर नक्कीच झाली असतील....... विनय,आशिष,गणेश,तुषार,सुशांत,सागर, तेव्हा भेटले ते आजही सोबत आहेत , आजही अधे मधे साइबर मधे जाऊन खेळायची हुक्की आली की सगळे परत जूने दिवस आठवत आम्ही सर्व मनसोक्त खेळून येतो  . डिप्लोमा झाला ,डिग्री झाली हे वेड कमी झाल तोवर क्रिकेट चालू झाल मग काय दर शनिवार , रविवार क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेट झाल्यावर मिसळ, मिसळ खायला तर सगळी मुले पार नारायणगाव पर्यन्त जाऊन येतात, आमच्याकड़े बरेच चांगले खेळणारे खेळाडू आहेत आशिष, विनय (आमचा कॅप्टन :) ), सुशांत, तुषार, सागर, नीलेश, गणेश, प्रणव, अमित, हर्षद, निखिल, अक्षय, ज्ञानेश्वर, अभिषेक, प्रतिक आणखी बरेच असेच खेळायला येत असतात ( तस मला जास्त चांगल खेळता येत नाही पण तरीही मला मज्जा येते ) . खेळताना सगळे इतके aggressive असतात की बाप रे !!! त्यातल्या त्यात आशिष, विनय तर कोणालाच ऎकत नाहीत, हल्लीच आम्ही एक Tournament जिंकलो जाम धम्माल केली आम्ही तेव्हा.


       दर वर्षी कोकणात दापोली, गणपती पुळे , हर्णे, असे फिरायला आम्ही जातच असतो, आधी बाइक वर जायचो आता सगळ्यांकडे चारचाकी आल्याने चारचाकी ने जातो, तिथे खुप गप्पा होतात, प्रत्येकाच्या मनातल बाहेर येत. बीच क्रिकेट ,फुटबॉल , कबड्डी असे अनेक खेळ खेळतो जामच मज्ज्या येते.




                     

आमच्या मधे ३-४ जणांची लग्न झालेली आहे , बरयाच घरगुती कार्यक्रमात सगळे हजर असतात, दरवर्षी सणासुदीला सगळे एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात, घरच्या लोकांना पण आमची मैत्री पाहून फार आनंद होतो. असा एकही लग्न/साखरपुडा झालेला नाही की त्या लग्ना मधे सर्व मित्रांची तारीफ़ झालेली नाही , प्रत्येक लग्ना मधे आम्ही हे ऐकला आहे की तुम्ही सगळे मित्र होतात म्हणून हे सगळ छान पार पड़ल, आणि हे ऐकल की आम्हाला सर्वाना खुप भारी वाटत. आमच्या मधे प्रत्येकाचे
एक वेगळे स्थान आहे, सगळ्यांचे स्वभाव वेगळे आहेत, पण सूख असो दुःख असो सगळे हातातले काम सोडून अडचणी मधून मार्ग काढून हजर असतात, कितीही अटीतटीची भांडणे झाली कितीही विकोपाला गेली तरी.......  तरीही पाहिले सॉरी कोण म्हणेल या मधे चढाओढ असते आणि मला वाटत यालाच मैत्री म्हणतात.


          माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधेहि असेच काही जे माझ्या शाळेत नसलेले फ़क्त ट्रेकिंग मुळे मला भेटलेले असे छान दोस्त मला मिळाले, खरतर माझ्या काकालोकांचा ट्रेकिंगचा जूना ग्रुप २५-३० वर्ष झाली असतील ते सर्वे ट्रेक करत असल्यामुळे ते नेहमीच ट्रेकला जात असायचे, मी तिकडे कधी पासून जाऊ लागलो मला आठवतही नाही, माझ्या शब्दात मी म्हणेन "गडकोट किल्ले हे तर आपले जणू दूसर घरच, फारच प्रेम आहे माझे ऊंच ऊंच कड्यांवर , कोसळणारया धो धो पावसावर, सोसाट्याच्या वारयावर आणि त्यामधे हे सगळे मित्र सोबत असतील तर क्या बात !!!! " मग सवय लागली मित्रांसोबत जायची मग ग्रुप तयार झाला, सगळे सोबत जाऊ लागलो. खुप मज्जा येते जेव्हा गडावर आम्ही सर्व लोक एकत्र बसलेलो असतो, कुणाचाही त्रास नाही फ़क्त आणि फ़क्त असतात त्या आमच्या गप्पा , तो समोरचा गड , आजुबाजुच घनदाट जंगल आणि समोरच वाहता ओढ़ा !!!!
 

 



       माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधे दोघांची लग्न झालेली आहेत आणि एक-दोघे लग्नाच्या वाटेवर आहे नचिकेत, सायली, सुबोध , नेहा, वरुण, उमा, अभिराज, अमेय, अमित, दिनेश, श्रीधर,दर्शन ,कौशिक,निखिल,हर्षद आणि अधेमधे आणखीही काही लोक ट्रेकला येत असतात, काही वर्षापुर्वी आम्ही इतके ट्रेक ल जायचो की बस्स !! काही काही ट्रेकला तर मी आईला सांगायचो " आई आलोच जाऊन आणि चक्क गडाजवळ आलो की सांगायचो " मी एका जवळच्या गडावर आलोय येतो संध्याकाळ पर्यन्त " मग घरी आल्यावर जामच तम्बी मिळायची, एका आठवड्यामागून एक अश्या पुढच्या ट्रेक ला जाताना आईला विचारल की आई मला म्हणायची " अजिबात कुठेही जायच नाही, सारख सारख काय ठेवलाय गडावर आणि जायचच असेल तर आता गडावरच जाऊन रहा काही यायची गरज नहीं आहे घरी ! " मग सगळी मुला आईला सांगायला घरी "काकू जाऊदयाना,सोडाना त्याला परत नाही जाणार आम्ही त्या गडावर आणि पुढचे काही दिवस तर अजिबात कुठेच जाणार नाही घरीच थांबू ". काही वेळाने मुल घरी गेली की परत मला शिव्या बसयच्या "तूच म्होरक्या आहेस सगळ्यांचा सारख सारख तूच ठरवत असतोस हे सगळे। असे. ....... तसे. " रात्री परत मग लाडी गोडी लावून आम्ही सगळी पोरे दुसरया दिवशी गडावर !!!!!!
         

       आणखी असे बरेच खुप छान , चांगले दोस्त मी कमावले आहेत एम आय टी कॉलेज मधला ग्रुप , फिरोदिया करंडक मधले मित्र, माझ्या कंपनी मधले दोस्त, माफ़ी असावी कारण सगळ्यांचाच उल्लेख येथे करू शकलो नाही, पण जेवढे पण मित्र मला भेटले ते सर्वच चांगले मिळाले कोणीही माझे वाईट चिंतले नाही अथवा मी कोणाचे वाईट चिंतले नाही. व पु काळे यांची एक खुपच सुंदर कविता येथे देत आहे नक्की आवडेल सगळ्यांना... .... ......  ... .... ......... .... ......  ... .... ......  



तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
सुरुवात कधी झाली, पुढाकार कोणी घेतला
दिवस कोणता – तारीख काय? किती वर्ष झाली?
हे तपशील म्हटलं तर सार्थ आहेत
पण म्हटलं तर व्यर्थ आहेत, कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रोज भेटतो - असही नाही,
रोज फोन करतो - तर तसही नाही
एकमेकांकडे सारखे जातो येतो - असं तर नाहीच नाही
तरी पण स्नेहाचा बंध घट्ट आहे कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
चौऱ्यांशी लक्ष योनी हिंडून झाल्यावर
माणूस जन्म मिळाला म्हणे !
मागचा जन्म आठवत नाही, अन पुढचा दिसत नाही
पण खरं सांगू या जन्मात तुझ्याशिवाय करमत नाही कारण ...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
हल्ली वाढदिवस लक्षात ठेवायची स्टाईल आहे
एकमेकांचा, बायकांचा, मुलांचा, लग्नाचा
आणि कशाकशाचा ...
हे सारं आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं
पण हे सारं ठार विसरूनही, आपलं काही अडत नाही कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रिलेशनशिप हा आजचा परवलीचा (आणि गुळगुळीत) शब्द
रिलेशनची शिप, कुठलाही विचार न करता
लगेच पाण्यात ढकलायचे हे दिवस
बरेचदा मग ती गैरसमजांच्या खडकावर आपटून फुटतेच
आपल्या नात्याला असलं नावही नाही
आणि त्यामुळे गैरसमजांच्या खडकांना
त्याचं काम करायला वावही नाही कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
“मदत” शब्द आपल्या नात्याला गैरलागू आहे
कारण त्यातही “मद” आहेच
साद आली तर प्रतिसाद मिळतोच
हाक आली तर ओ येतेच
पण ती मारण्याची वेळच आपल्यावर येत नाही
त्याआधीच ओ येते कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे.


           आयुष्यात कोणावाचुन कोणाचे अडत नसते पण जर आपले मित्रच आपल्या सोबत नसतील तर आपले आयुष्य हे रंग नसलेल्या चित्रा सारखे पांढरेफटक होऊन जाईल. थोड़े असो वा जास्त असो जीवाभावाचे मित्र तुमच्या कड़े असतील तर तुम्हाला आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही .