Tuesday 5 July 2016

अभिराज कचरे सरांच (आण्णाच ) फेअरवेल .. !!!

दिनांक ५-७-२०१६
          अभिराज कचरे  सरांच (आण्णाच ) फेअरवेल .. !!!  अभिराजच आण्णा हे टोपणनाव ( फ़क्त मित्रांमधे !! आणि त्याच्या विद्यार्थ्यांना आज ते कळलय त्यामुळे आता मला इथे लिहायला काहीच हरकत नाहीं. ) अभिराज कचरे हा माझा मित्र आणि  PCCOE या इंजीनियरिंग कॉलेज मधे एका वर्गाचा क्लासटीचर आहे म्हणजे तो होता आजपर्यंत ।
    संध्याकाळची ६.१५ - ६.३० ची वेळ ऑफिस सुटल आणि आता निघणार तेवढ्यात मयूरचा  (अभिराज सरांचा विद्यार्थी ) मला फ़ोन. अरे निखिल आज सरांच फेअरवेल आहे केक वर नाव काय लिहू ? आणि तुला जमेल का यायला ? सरांना सरप्राइज़ देऊ !!! ( माझी आणि याची ओळख एका अभिराज सोबतच्याच ट्रेकला झाली होती ) . मी म्हणालो ठीक आहे येतो , चला तेवढीच जरा आण्णाची खेचुया ६.३० - ६.४५ च्या दरम्यान पोचलो कॉलेज वर मग जरा जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझ्या डिप्लोमा कॉलेज वर एक चक्कर मारली। आणि मग मयूर ,ओंकार केक घेऊन आले मला भेटले मग थेट आण्णाच्या क्लासरूम मधे गेलो , कचरेसर तिथे नव्हते ते बाकीच्या प्रोफेसर लोकांच्या फेअरवेल मधे अडकले होते , क्लासरूम मधे आधीच पोरांची तयारी चालु होती कोण कोण काय काय करणार , सरांना भारी कसे वाटेल आणि आपण काय काय करुयात वगैरे वगैरे , माझी ओळख मयूर ने सगळ्यांशी करून दिली आणि मीही त्या मुलांमधलाच एक विद्यार्थी झालो. आधीच पोरांनी बॉर्डवर बरच काही लिहुन ठेवला होता मग मिहि त्यामधे काही गोष्टी भरल्या सुबोधला फ़ोन केला त्याने एक वाक्य सांगितला ( सुबोध जोशी PCCOE मधलाच अभिराज सोबतचा अतिशय हुशार विद्यार्थी की जो आत्ता IIT मुंबई ला पीएचडी करत आहे )  अशी  ४-५ वाक्य फळ्यावर लिहिली की जी फ़क्त आण्णा आणि त्याच्या मित्रांनाच माहित होती. आता तो बोर्ड पूर्णपणे भरला होता ,

         मग मी मुलाना सुचवल की सरांची वर्गात एन्ट्री झाली की " शक्तिमान " सिरिअल च गाणे म्हणायचे, तसा ठरलहि , थोड्या वेळाने सर येत आहेत असे सांगत एक विद्यार्थी आला,सगळ्यांनी दिवे बंद केले आणि वाट पाहू लागले मि काही पोरांमागे लपून बसलो. १० मिनट झाले तो काही आला नाही परत कोणीतरी म्हणाल सर आले सर आले पुन्हा तसच तो आला नाही , क्लासरूम मधे येताना बरेच सरलोक त्याला भेटत होते त्यामुळे सगळ्यांशी बोलत बोलत त्याला यायला वेळ होत होता. थोड्या वेळाने शेवटी त्यांची एन्ट्री झालीच वर्गात , सगळे चालु " शक्ति शक्ति शक्तिमान!!!शक्ति शक्ति शक्तिमान!!! शक्ति शक्ति शक्तिमान !!! "  आणखी काही त्यांची ठरलेली वाक्य म्हणून झाल्यावर सगळी पोर ओरडायला लागली "सर जाऊ नकाना " , " फ़क्त तुमच्याच लेक्चर ला मज्ज्या येते तुम्ही खुप भारी शिकवता " "आणि तुम्ही गेल्यावर आम्हाच्या Friday Story च काय ?" वगैरे वगैरे नुसता किलकिलाट चालू होता , मग सरांनी सगळ्यांना शांत केला समजावले आणि सगळे शांत झाल्यावर दिवे लावले आणि बोर्ड वाचू लागले ,
भरलेला बोर्ड !!! 

हे कोणी सांगितला तुम्हाला ? ते कोणी सांगितला ? निखिल्या ने सांगितला का ? मला मनातल्या मनात शिव्या घालत विचारत !!!!!!   ... .......  पोरा आपली म्हणत आहेत हसत हसत आम्हाला नाही माहित कोणी लिहिलय ते कोण निखिल ?  , मग जे जे काही लिहिला होता त्याचा खुलासा करा असा मुलांचा आग्रह !!! मग त्या विषयी जे जे जसे जसे घडले होते ते मजेदार किस्से आण्णा ने मुलांना सांगितले आणि ते किस्से सांगताना पोर एकदम कान लाऊन ऐकत होते पोटधरून हसत होते  ,  मी आपला मागे लपून बसलो होतो मिहि आपला छान पणे हसत ऐकत होतो सर्व . एक दोन किस्से सांगताना मधूनच काही थोड़ा असा रोमांटिक मूड मधे पोर मागून  " Hmmmmmmm "  " Hmmmmmmm mmmmmmm  "  करायची आणि तो आपला लाजरा बोजरा व्हायचा आणि म्हणायचा अरे तुम्ही समझताय तसा काहीही नाहीये !!!! .......
सगळे किस्से संपल्यावर शेवटच्या किस्स्याला मी बाहेर आलो आणि मला पाहिल्यावर दोन  चार शिव्या देऊन "साल्या तू आहेस काय इकडे मला वाटलच तुझ्या शिवाय हे कोण सांगणार यांना "
मग थोड्याफार गप्पा मीही मारल्या मुलांसोबत मज्जा आली, त्याना सगळ्यांनाच असा वाटत होत की सरानी सोडू नये म्हणून।  मग काही मुलांनी आणि सरांसोबत आलेले छान अनुभव सगळ्यांना सांगितले काही जणांनी ट्रेक चे अनुभव तर काहींनी कॉलेज मधले अनुभव सांगितले ते सांगताना अभिराजला पण खुप भारी वाटत होत. सरतेशेवटी मुलांनी आणलेला केक सरांनी कापला आणि शेवटी मुलांना एक आण्णा ने छान शिकवण दिली त्याला जो अनुभव आला होता त्यामधून , मलाही ते फार आवडल. तो म्हणाला "आयुष्यात खुप असे कठीण प्रसंग येतात की त्यामधे देव तुम्हाला खुप कठोर पणे तपासतो , तुम्हाला आजमावतो , तुमच्यामधे कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची  किती क्षमता आहे ते तो तपासतो , त्या परिस्थितीतही तुम्ही खंबीर पणे उभे रहा , आलेल्या प्रसंगाला सामोरे जा तुम्ही निश्चितपणे जिंकाल ! " 
       पोरे एकदम खुश नुसत्या टाळ्या आणि टाळ्या !!!!
धन्यवाद !!! आपण सगळे पुढच्या एका ट्रेकला नक्की भेटू !!! असे म्हणून आम्ही दोघांनी सगळ्या मुलांचा निरोप घेतला आणि निघालो।

सर आणि केक !!
 सरांचे विद्यार्थी !
सर आणि विद्यार्थ्यांसोबत मी 





पोरांनी केलेला कल्ला !!!